Tuesday, June 3, 2014

श्री गणेशाय नम:I

'दिसामाजी काहीतरी ते लिहावे ' असे अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहे!
पण ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण सुद्धा मनात खोलवर रुतून बसली आहे!
'काहीतरी ते' लिहिण्यापेक्षा जेंव्हा वाटेल तेंव्हाच लिहावे हे खरे!
आणि हल्ली हल्ली मला पुन्हा एकदा 'काहीतरी ते' लिहावे असे वाटू लागले आहे!
अनेक मित्र मैत्रिणींचे ब्लॉग वाचून-पाहून आपणही 'काहीतरी ते' तर नक्कीच लिहायला हवे असेही वाटू लागले आहे!
त्यामुळेच या ब्लॉग विश्वातला एक ब्लॉगर म्हणून लिहायला सुरुवात करतो आहे!
सुरवातीला काही जुन्या लिखाणाकडेही नजर टाकतो आहे. त्यातले उपयुक्त वाटणारे काही देखील येथे पुन्हा लिहावे असा विचार आहे… हा शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार नाही बरे… मला जे खरोखरच उपयुक्त वाटते आहे तेच हे सारे…
तेंव्हा
श्री गणेशाय नम: 

No comments:

Post a Comment